नांदेड : मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेडमध्ये शिक्षणक्रांती अभियानाचा भव्य सोहळा आयोजित केला जाणार
आहे. या उपक्रमांतर्गत पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना MPSC आणि UPSC मार्गदर्शन दिले जाईल, तसेच आंबेडकरवादी मिशनतर्फे नांदेड जिल्ह्यातील विविध समाजांच्या अभ्यास केंद्रासाठी UPSC संदर्भातील पाच लाख रुपयांच्या ग्रंथदानाचे आयोजन केले गेले आहे.
सोहळा दिनांक सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५, सायंकाळी ६.०० वाजता आंबेडकरवादी मिशन, सिडको नांदेड येथे पार पडणार आहे. हा कार्यक्रम आंबेडकरवादी मिशन आणि लक्ष्य फाउंडेशन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळणार असून, शिक्षणक्रांती अभियानाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि समाजातील पिछडलेल्या वर्गांसाठी शिक्षणाची संधी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

Post a Comment
0 Comments