परभणीत अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन : समृद्धी व बुद्धमय भारताचा संदेश

 परभणी,दि २४ : सम्राट अशोकांच्या सुवर्णयुगातील समृद्ध व बुद्धमय भारताचा संदेश देत परभणी येथे “अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन – २०२५” चे आयोजन होत आहे. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या उदात्त ध्येयवाक्याखाली हे संमेलन नुतन शिक्षण संस्था सभागृह, जिंतूर रोड, परभणी येथे रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडणार आहे.या संमेलनाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान भदंत मिलिंद बोधी स्थविर (श्रीलंका, थायलंड) तथा प्राचार्य डॉ. सिद्धोधन कांबळे (विपश्नाचार्य, मुंबई) भूषवतील. प्रमुख धम्मदेशना  भदंत बुद्धकिर्ती महाथेरो (जिल्हा अध्यक्ष, हिंगोली) आणि भन्ते मुदितानंद थेरो (जिल्हा अध्यक्ष, परभणी) यांच्याकडून होईल.मुख्य मार्गदर्शक म्हणून अमितजी नरवाडे (बुद्धिष्ट नॅशनल अॅण्ड इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर, नागपूर) उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात पालि तिपिटक व बौद्ध धम्मग्रंथ साहित्य, बौद्ध नाट्य, कवितेचे सादरीकरण, संगीत, तसेच शिल्प, चित्र व स्थापत्यकलेवर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत.या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक  एस.पी. शिवभगत असून, आयोजक स्वागताध्यक्ष म्हणून अॅड. डॉ. यशवंतकुमार कसबे (संस्थापक अध्यक्ष, बुद्धिस्ट इंडिया डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) तसेच प्राचार्य डॉ. सुनील जाधव आणि प्रा. शिवाजी कांबळे यांचा सहभाग आहे.कार्यक्रमाचे निमंत्रक  भन्ते सुगत शांतेय (बोधगया, बिहार) असून, संमेलनाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध धर्माच्या प्रगती, संशोधन व विकासाबाबत सखोल विचारमंथन होणार आहे.भारतीय बुद्धिस्ट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा हा ऐतिहासिक सोहळा ठरणार असून, सर्व बौद्ध बांधवांनी यात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp