अंबाजोगाई : मातंग समाजातील आंबेडकरवादी युवकांच्या आत्मभान परिषदेचे आयोजन २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मानवलोक रिंग रोड, अंबाजोगाई येथे करण्यात आले आहे. परिषदेत समाजातील युवकांना आंबेडकरवाद्यांच्या चळवळीतील सहभाग, आरक्षण उपवर्गीकरणाचे फायदे-तोटे आणि प्रबोधनाच्या चळवळीसमोरील आव्हाने यावर विचारविनिमय होणार आहे.
पहिल्या सत्राची अध्यक्षता मा. प्रा. डॉ. मिलिंद आवाड (राष्ट्रीय अध्यक्ष, मानवी हक्क अभियान) करणार असून, उद्घाटक मा. युवराज पवार (सोलापूर) आणि मार्गदर्शक प्रा. डॉ. विजय कुमठेकर (जालना) असतील. सत्रात मातंग समाजाचे आंबेडकरवादी चळवळीतील योगदान या विषयावर चर्चा होईल.
दुसऱ्या सत्राची अध्यक्षता मा. आर.डी. जोगदंड (जेष्ठ नेते) करणार असून, उद्घाटक मा. विकास पाथरीकर (अध्यक्ष, लहुजी क्रांती मोर्चा) आणि मार्गदर्शक मा. अजिंक्य चांदणे (प्रदेशाध्यक्ष, डीपीआय) असतील. या सत्रात आरक्षण उपवर्गीकरणाचा मातंग समाजाला होणारा फायदा किंवा तोटा यावर चर्चा होईल.
तिसऱ्या सत्राची अध्यक्षता मा. अशोक पालके (संस्थापक अध्यक्ष, युवा आंदोलन) करणार असून, उद्घाटक मा. धिमंत राष्ट्रपाल (माणुस वाचवा अभियान) आणि मार्गदर्शक प्रा. डॉ. मनिषा झोंबाडे (बार्शी) उपस्थित असतील. या सत्रात मातंग समाजातील प्रबोधनाच्या चळवळी समोरील आव्हाने यावर विचारविनिमय होईल.
परिषदेत लक्ष्मीकांत शिंदे, आनंद सुर्यवंशी, भास्कर गायकवाड, दुपक भालेराव, संतोष वाघमारे, आकाश वाडेकर, दिपक पगारे, आकाश वाघमारे, अंकूश सुर्यवंशी, अमोल शेरकर, राहुल शिंदे यांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन जालिंदर कसाब (जिल्हाध्यक्ष, युवा आंदोलन, बीड), संजय साळवे (जिल्हाध्यक्ष, युवा आंदोलन, मुंबई), नितीन जोगदंड (जिल्हाध्यक्ष, युवा आंदोलन, पुणे) यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments