Type Here to Get Search Results !

माहूर येथे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन : डॉ. अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन

 माहूर, ता. २४ : निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन २०२५ रविवारी (ता.२६) माहूर येथे होणार आहे.

या संमेलनाचे प्रेरणास्थान पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे हे आहेत.तर संस्थापक अध्यक्ष स्व. आबासाहेब राजाराम मोरे हे आहेत त्यांना प्रारंभी अभिवादन करण्यात येईल.

संमेलनाचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान पद्मश्री सय्यद शब्बीर (मामू, बीड) भूषवणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्रा दोन्तुला,जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली केशव वाबळेसूर्यकांत शिंदेसंदिप चव्हाण आदी मान्यवर  उपस्थित राहणार आहेत. गोपाळसिंह चौहान (संचालक, सी.टी. विट्न प्रा. लि.) हे स्वागताध्यक्ष आहेत

रविवारी(ता.२६)सकाळी ६ ते ७ योग व प्राणायाम,९ ते १०.३० नोंदणी आणि स्वागत,१०.३० ते १.३० उद्घाटन समारंभ.दुपारी २.३० ते ३.३० “पाणी समस्या” या विषयावर बाबूराव केंद्रे (जलपुरुष, लोहा) यांचे मार्गदर्शन,३.३० ते ४.३० अॅड. उदय संगारेड्डीकर (नांदेड) यांचे “विषमुक्त शेती व गोसंवर्धन” व्याख्यान,सायं. ५ ते ६ प्रा. डॉ. रमजान विराणी (यवतमाळ) यांचे “वन्यजीव संवर्धनाचे वास्तव”,६ ते ७ अविनाश पोळ यांचे “पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती” विषयावर व्याख्यान होईल.

सोमवारी(ता.२७) सकाळी १० ते १ चर्चासत्र आणि पारितोषिक वितरण.समारोप कार्यक्रम दुपारी ११ ते १२ दरम्यान होईल.मुख्य पाहुणे म्हणून डॉ. गोविंद नांदेडे (माजी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमानंतर मातृतिर्थ, पांडवलेणी, वझरा (शेख फरिद), सोनापीर दर्गा, भोजन्ती (मेरू आळा तलाव) आणि जमदग्नी खोरी (आश्रम) या ठिकाणी पर्यावरण जागर व मार्गदर्शनात्मक भेटी होणार आहेत.

उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे-गुणबरे, जिल्हाध्यक्ष  सारनाथ लोणे आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments