नांदेड : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स् (CITU) चे ८ वे नांदेड जिल्हा अधिवेशन रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सांगवी (नांदेड) येथे उत्साहात पार पडणार आहे. कामगार चळवळ मजबूत करण्यासाठी व संघटनात्मक कार्याला नवी दिशा देण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे स्थळ “कॉ. सीताराम येचुरी नगर”, “कॉ. भुमा गायकवाड सभागृह” आणि “कॉ. द्रोपदा जवळे मंच”, सांगवी असे नामकरण करण्यात आले असून, जिल्ह्यातील निवडक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनाला डॉ. कॉ. डी.एल. कराड, (राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष, सीटू), कॉ. अॅड. एम.एच. शेख (राज्य सरचिटणीस, सीटू) आणि कॉ. शुभा शमीम (राज्य उपाध्यक्षा, सीटू) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभणे यांच्या हस्ते होईल, तर अध्यक्षस्थान राज्य सचिव तथा जिल्हा अध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार भूषवणार आहेत. कॉ. शंकर सिडाम (जनवादी चळवळीचे नेते) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या अधिवेशनाचे जनरल सेक्रेटरी म्हणून कॉ. गंगाधर गायकवाड काम पाहणार आहेत. आयोजन समितीत कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. शिला ठाकूर, कॉ. शिवाजी गायकवाड, कॉ. कालीदास सोनुले, कॉ. वर्षा सांगडे, कॉ. सारजा कदम, कॉ. दिलीप पोतरे, कॉ. जनार्धन काळे, कॉ. अनिल कराळे, कॉ. दिगांबर काळे व कॉ. श्रावण जाधव यांचा समावेश आहे.
या अधिवेशनातून कामगारांच्या हक्कांसाठी, संघटनात्मक बळकटीसाठी आणि केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात ठोस भूमिका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
📍 स्थळ : सांगवी, भारत गॅस गोडाऊन रोड, नवीन दत्त मंदिर जवळ, सांगवी, नांदेड.
🕚 वेळ : सकाळी ११ वाजता (रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५)
Post a Comment
0 Comments