किनवट : बोधडी(ता.किनवट)परिसरा
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पायोनियर कंपनीच्या ३३९६ मका बियाण्याची मागणी केली असता, “साठा संपला” असा बहाणा करण्यात आला. मात्र, चौकशीत या बियाण्याचा पुरेसा साठा पाच कृषी केंद्रांमध्ये असल्याचे उघड झाले.
गुणनियंत्रण अधिकारी बालाजी मुंडे व बालाजी शेनेवाड यांनी घटनास्थळी चौकशी करून नीलेश फर्टिलायझर्स, अरुण ट्रेडिंग कंपनी, भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्र, जन्नावार कृषी सेवा केंद्र आणि चंद्रभागा कृषी सेवा केंद्र या पाच केंद्रांना सील ठोकले.
तपासात काही शेतकऱ्यांकडून अधिक दराने बियाणे विकले गेल्याचेही स्पष्ट झाले. पुढील कारवाईसाठी परवाना निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.
शेतकऱ्यांनी विभागाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Post a Comment
0 Comments