Type Here to Get Search Results !

आमदार भीमराव केराम यांची मागणी : किनवटला सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी द्यावी!

 किनवट,ता.२८ : किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदा


र भीमराव भीमाई रामजी केराम यांनी राज्याचे पणन तथा राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांना निवेदन देऊन, किनवट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनात आमदार केराम यांनी नमूद केले आहे की, किनवट आणि माहूर तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या आव्हानांवर मात करून मेहनतीने सोयाबीन पिकाची काढणी केली आहे. मात्र, शासनाच्या हमीभावाने खरेदी केंद्र अद्याप सुरु न झाल्याने व्यापारी कवडीमोल दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

किनवट ही आदिवासी बहुल व दुर्गम भागातील "क" वर्गाची कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने, समितीला खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी गेल्या तीन वर्षांची किमान ३ कोटी रुपयांची उलाढाल दाखविण्याची अट आहे. परंतु, त्या अटीमुळे समितीला खरेदी केंद्र सुरु करणे शक्य होत नाही. समितीने २०१७ पासून सातत्याने खरेदी केंद्र सुरु केले असून, सन २०२४-२५ मध्ये तब्बल ३२,४२६ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे, असे केराम यांनी स्पष्ट केले.

आ. केराम यांनी शासनाकडे मागणी केली की,
आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही अट शिथिल करून किनवट बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळून त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल, असेही त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आ. केराम यांचा पुढाकार
किनवटसारख्या आदिवासी व शेतीप्रधान भागातील शेतकऱ्यांसाठी ही मागणी अत्यंत महत्त्वाची ठरत असून, या मागणीमुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.



Post a Comment

0 Comments