पुणे : समाजातील स्त्रीवादी परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यासाठी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या वतीने शनिवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे.
या परिषदेत राज्यातील विविध भागांतून कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विचारवंत सहभागी होणार असून स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीला बळकटी देण्यावर भर दिला जाणार आहे.
परिषदेत डॉ. मनीषा गुप्ते, लता भिसे सोनवणे, अॅड. निशा शिवूरकर, अमोल केरकर, उज्वला मसदेकर, छाया राजे, सरिता मोकाशी आणि अलका पावनगडकर यांसारख्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग असेल. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी स्त्रीवादी दृष्टिकोनातून धोरणे आणि कृती आराखडे ठरविण्याबाबत या परिषदेत चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी आपल्या सहभागाची आणि सहकार्याची अपेक्षा आहे; १ नोव्हेंबरला नक्की भेटूया.”

Post a Comment
0 Comments