नांदेड : समाजातील युवकांना उद्योग क्षेत्रात नवे प्रोत्साहन मिळावे, उद्योजकतेचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आंबेडकरवादी मिशन, सिडको नांदेड यांच्या वतीने ‘उद्योजक मार्गदर्शन परिषद’चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद येत्या शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वा. आंबेडकरवादी मिशन कार्यालय, आंबेडकर चौक, सिडको, नांदेड येथे होणार आहे.
या परिषदेत उद्योग विभागाचे अधिकारी, नामांकित उद्योजक व तज्ज्ञ युवकांना उद्योग स्थापनेसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून
मा. वैभव वाघमारे (IAS), उपविकास आयुक्त, उद्योग व नियंत्रक अधिकारी (मैत्री) उपस्थित राहणार आहेत.
तर प्रमुख उपस्थिती मध्ये
मा. आर. के. सिंग (उद्योजक, बुलंदशहर, उत्तर प्रदेश – राष्ट्रपती व मुख्यमंत्री पुरस्कारप्राप्त),
मा. अमोल इंगळे (जी.एम., डी.आय.सी. नांदेड),
मा. अनिल कदम (जी.एम., डी.आय.सी. हिंगोली),
मा. शंकर पवार (प्रोजेक्ट ऑफिसर, ई.डी. नांदेड),
मा. मारोती कंठेवाड, मधूकर गच्चे, शिवराज टोम्पे, सुरेश भाले, दीपक मांजरमकर, सी.आर. सांगलीकर, बालाजी कंठेवाड, अशोक जोंधळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा विशेष सत्कार होणार असून,
मा. प्रकाश नगारे, प्रदीप वाघमारे, प्रदीप रोकडे (बीड), भगवान धबडगे (पी.आय. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त), स्वप्नील नरबाग, प्रसेनजित वाघमारे, इंजी. प्रशिक रमेश चित्ते (आपुलकी मिल्क पाली), माधव डोम्पले, गौतम कांबळे, देविदास रंगदळ, केशव जोंधळे, सूर्यकांत गदेवार सावकार आदींचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मा. दीपक कदम (प्रमुख, आंबेडकरवादी मिशन) यांनी केले असून,
ही परिषद युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून उद्योगक्षेत्रातील नव्या संधींचा शोध घेण्यास नक्कीच हातभार लावेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Post a Comment
0 Comments