कोल्हापूर : महिलांच्या अनुभवांना, संघर्षांना आणि सर्जनशीलतेला साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त करणारे “पहिले राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलन” भारतीय महिला मंचतर्फे कोल्हापुरात आयोजित करण्यात आले आहे. “फक्त महिलांनी आणि महिलांसाठी” या अनोख्या संकल्पनेवर आधारित हे संमेलन रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे.
या ऐतिहासिक संमेलनाचे अध्यक्षस्थान मा. रंजनाताई सानप (मायणी, सातारा) भूषवणार असून, उद्घाटन मा. स्मिताताई पानसरे (अहिल्यानगर) यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मा. सुमनताई पुजारी (सांगली) यांच्याकडे असून, निमंत्रक म्हणून अॅड. करुणाताई विमल (कोल्हापूर) कार्यरत आहेत.
काव्यविभागाचे संमेलनाध्यक्ष प्रा. सुचिता गायकवाड (कणकवली) असतील. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून मा. भारतीताई पवार व मा. सरलाताई पाटील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात मा. षण्मुखा अर्दाळकर, डॉ. शोभा चाळके, मा. सीमा पाटील, डॉ. स्वाती नांगरे यांसारख्या मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
सह-निमंत्रकांमध्ये विमल पोखर्णीकर, अनिता गायकवाड, नीती उराडे, वृषाली कवठेकर, राजश्री मधाळे, अॅड. तमन्ना मुल्ला, आशा केसरकर, प्रीती पवार, कमल कवठेकर, उषा कोल्हे, मंगल समुद्रे, शकुंतला सावंत, वंदना धनवडे, विजया कांबळे, पद्मा माळवी, आणि मंदाकीनी तरटे या उत्साही कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे समन्वयकपद मा. अंतिमा कोल्हापूरकर यांनी सांभाळले आहे.
या संमेलनास सर्व महिलांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्त्रीची लेखणी, स्त्रीचा आवाज आणि स्त्रीच्या विचारांची नवी दिशा — याच उद्दिष्टाने हे संमेलन महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात एक नवीन पर्व ठरणार आहे!