Type Here to Get Search Results !

“नवीन शैक्षणिक धोरणावर बहुजन दृष्टिकोन : छत्रपती संभाजीनगरात फुले-शाहू-आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनची वैचारिक कार्यशाळा”

 छत्रपती संभाजीनगर, दि. २५ :

“सुशिक्षित करा, संघर्ष करा, संघटीत करा, आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका” या प्रेरणादायी विचारांना उजाळा देत फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन आणि दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) यांच्या संयुक्त विद्यमाने १४० वी शतकोत्तर वैचारिक प्रबोधनात्मक कार्यशाळा रविवारी, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेचे उदघाटन मा. प्रा. अरुण कोळी (उप प्राचार्य, चेतना महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख वक्ते म्हणून मा. प्रा. डॉ. प्रकाश करमाडकर (सामाजिक कार्यकर्ते, छत्रपती संभाजीनगर) मार्गदर्शन करणार आहेत. विशेष उपस्थिती मा. डॉ. रमेशचंद्र धनेगावकर (सामाजिक कार्यकर्ते) यांची राहील.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. बी. बी. मेश्राम (संचालक, फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन) असतील.
प्रास्ताविक मा. विलास कटारे (समन्वयक) ,तर सूत्रसंचालन मा. अॅड. विलास रामटेके (समन्वयक) करतील.

या कार्यशाळेचा मुख्य विषय “नवीन शैक्षणिक धोरणाचे बहुजन समाजातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व समाजावर होणारे परिणाम” असा असून, शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्व घटकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण विचारमंथनाचा मंच ठरणार आहे.

कार्यक्रम दुपारी २.३० वाजताफुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे जनसंपर्क कार्यालय, साकेतनगर, भावसिंगपूरा रोड, छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून, आयोजकांनी सर्व समाजबंधूंना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

संपर्क क्रमांक: 9421678628, 9869322152, 8806384115, 8983082128, 9822771919.

Post a Comment

0 Comments