Type Here to Get Search Results !

"सीटू",च्या जिल्हाध्यक्षपदी किनवट तालुक्याच्या भुमीकन्या कॉ. उज्ज्वला पडलवार

 किनवट :  सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) चे आठवे जिल्हा अधिवेशन नांदेड येथील पीपल्स महाविद्यालय परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात नुकतेच उत्साहात पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन कामगार नेते विजय गाभणे यांच्या हस्ते करण्यात आले.

    अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी नवीन जिल्हा समितीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी किनवट तालुक्याच्या भुमीकन्या  कॉ. उज्ज्वला पडलवार या़ंची, तर सरचिटणीसपदी गंगाधर गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली. समितीत उपाध्यक्षपदी करवंदा गायकवाड, शीला ठाकूर आणि दिगंबर काळेसचिवपदी अनिल कराळे, जनार्दन काळे आणि वर्षा सांगडे यांची तसेच कोषाध्यक्षपदी विजय गाभणे यांची  निवड करण्यात आली.

      अधिवेशनाच्या खुल्या सत्रात मार्गदर्शन करताना 'सीटू', चे राजाध्यक्ष डॉ. डी.एल.कराड म्हणाले की,, सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह असून, आपल्या न्यायहक्कांसाठी संघर्ष केल्याशिवाय कामगारांचे अस्तित्व टिकणार नाही. संघटितपणे आणि सातत्याने लढा दिला, तरच अन्यायाविरुद्ध विजय मिळवता येईल.

    १९९० पासून सरकारच्या उदारीकरण धोरणांमुळे कामगार वर्गावर आर्थिक व सामाजिक संकट कोसळले आहे. आजची शासनव्यवस्था कामगारांना पुन्हा गुलामगिरीकडे ढकलत आहे. त्यामुळे कामगारांनी संघटित होऊन एकजूट निर्माण करणे अत्यावश्यक आहे; अन्यथा भविष्य अंधारमय ठरेल, असा इशाराही कॉ. डॉ. डी. एल. कराड यांनी दिला.यावेळी झालेल्या चर्चासत्रात डॉ. सिद्धार्थ थोरात, नागसेन कोकरे आणि डॉ. अशोक झुंजारे यांनी सहभाग नोंदविला.



Post a Comment

0 Comments